नाशिक मिरर वेबटीम : भूमिपुत्रांच्या मनामध्ये स्वराज्य व स्वाभिमानाची ज्योत चेतवून ती अखंड धगधगती ठेवण्याचे महान कार्य ज्यांनी केले, त्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती निमित्त छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पत्नी, माता आणि राज्यकर्त्या या तीनही जबाबदाऱ्या समर्थपणे व आदर्शवत पार पाडलेल्या जिजाऊ माँसाहेबां यांना छावा क्रांतिवीर सेनाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.यावेळी करण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, स्वराज्याला छत्रपती देणाऱ्या मासाहेब जिजाऊ चा इतिहास हा वैभवशाली असून छत्रपती शहाजीराजे यांच्यासोबत स्वराज्याची स्वप्न बघणार्या मासाहेब जिजाऊंनी ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्यनिष्ठा, स्वराज्य प्रेम, रयतेला न्याय कसा द्यायचा? रयत ही आपली प्रतिष्ठा आहे. संरक्षण करताना कुणावरही अन्याय होणार नाही, यासाठी बाराबलुतेदार ,अठरा पगड जाती, यांसह सर्व समाजघटकांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती करण्याची प्रेरणा मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांना दिली. मासाहेब जिजाऊ यांचे विचार आजही या भारतभूमीला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या प्रेरणेने आजही अनेक जिजाऊ या राष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र निर्माण करून आदर्श राष्ट्र घडविण्यासाठी प्रेरणा घेत आहे. यावेळी स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. स्वामी विवेकानंद हे नेहमीच काळाच्या खूप पुढे होते. आपल्या आजच्या आणि उद्याच्या प्रश्नांची मांडणी करून त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे आपल्या उपदेशांच्या माध्यमातून सांगितली आहेत. आपल्या भाषणांच्या माध्यमातून, परखड लेखणीच्या माध्यमातून विवेकानंदांनी रूढी, अंधश्रद्धा, धर्मातील अनाचार यांच्याविरुद्ध नेहमीच लढाई पुकारली. पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. ज्या समाजात स्त्रियांना समान हक्क मिळणार नाहीत, तो समाज उभा राहू शकणार नाही.असे पुरोगामी मत स्वामी विवेकानंद यांनी अशा काळात मांडले. ज्या काळात आपल्या भारतात स्त्रियांना पुरेसे स्वातंत्र नव्हते. त्यांनी नेहमीच विज्ञानाची कास धरली. स्वामी विवेकानंद यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून उपदेश दिले. देशाच्या युवा कसा असावा याची संक्षिप्त मांडणी त्यांनी केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात भारतीय तरुणांनी सदैव पुढे रहावं अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणूनच स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते, अशी माहिती छावा क्रांतिवीर सेनाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केले. यावेळेस नाशिक जिल्हाध्यक्ष आशिष हिरे ,प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे व शेतकरी कामगार आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष संजय बोरसे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांनि केलेल्या कार्याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी छावा क्रांतिवीर सेने कार्याध्यक्ष सुनिल सोनवने तसेच कामगार आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश पाटिल,कामगार आघाडी नाशिक शहर अध्यक्ष कल्पेश पाटील,युवा शहर अध्यक्ष योगेश आहिरे,सागर जाधव,मयूर शिंदे,कुंदन हिरे,सुमित जाधव, गणेश दळवी, सुभाष गवळी,महेश फणसे,सुदर्शन हिरे,अर्जुन पाटील,गणेश गीते,भगवान शिंदे,कृष्णा लोखंडे,संदीप खर्डे सह छावा क्रांतिवीर सेना चे पदधिकारी उपस्थित होते.
छावा क्रांतिवीर सेनेचे नाशिक शहरअध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी आलेल्या पदधिकाऱ्यांचे आभार मानले.
