अनेक वर्षाची मागणी पुर्ण झाल्याने  नागरिकानीं समाधान व्यक्त केल आहे
  नाशिक मिरर :   येथील शिवाजीनगरच्या मनपा प्रभाग क्रमांक ९ मध्ये  जनहितासाठी   प्रलंबित विविध विकास कामे मंजूर करून ती कामे तातडीने पूर्णत्वास नेण्याचा मानस नगरसेवक दिनकर पाटील यांनी केला आहे.
   वाढती लोकसंख्या,वाढते नगर,वाढती वाहने,  वहातुकीची वर्दळ आणि नित्य होणारे अपघात टाळण्यासाठी मोतीवाला वैद्कीय महाविद्यालय, कालवा ते त्र्यंबरोड पर्यंतच्या दोन किलोमीटर पर्यंतच्या सातपूर मधील सर्वात मोठ्या  रस्त्याचे दुभाजकाच्या कामाचे भूमिपूजन कोविडच्या नियमांचे पालन करून करण्यात आले.
            या १३० फुट  मंजूर  मोठया रस्त्याच्या कामांमुळे त्र्यंबकरोड  ते सोमेश्वर-गंगापुर रोडसह    औद्योगिक वसाहतीला जोडणारा एकमेव रस्ता असल्याने त्र्यंबक व सोमेश्वरला भाविक भक्तांची गैरसोय दुर होवून,अशोकनगर,श्रमिकनगर,कार्बन नाका ,शिवाजीनगर,धृव नगर येथील रहिवासीसह,औद्योगिक वसाहतीत कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची देखील गैरसोय दुर होणार आहे. याच रस्त्यावर महिंद्रा कंपनीत कमगारासह  कंपनीच्या मटेरियल गेट मध्ये जाणाऱ्या कच्चा मालवाहतूक करणाऱ्या ट्रक,ट्रेलर मुळे होणारे लहान मोठे अपघात टळणार आहे.दुभाजक नसल्याने सदर वाहने लेन कटिंग करून भरधाव धावत होती.आता दुभाजक मुळे वाहनाच्या वेगावर नियंत्रण राहणार आहे.
       नगरसेवक दिनकर पाटील आणि माजी नगरसेविका लता पाटील यांनी  या रस्त्यावरील दुभाजक टाकण्यासाठी मनपाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत सार्वजनिक हितासाठी सभागृहात १५ मार्च ते २३ मार्च २०१६  या काळात  ठिय्या आंदोलनही छेडले होते.
      अखेर त्यांच्या अथक प्रयत्नाला यश आले आहे. या रस्त्यांच्या कामा मुळे दोन किलोमीटर परिसरात वास्तव्य करनाऱ्या प्रभाग क्रमांक ९  व प्र.१० मधील नागरिकांची गैरसोय दुर होणार असल्याने नागरिकांनी नगरसेवक दिनकर पाटील यांचे आभार मानले आहेत.सदर रस्ता दुभाजक काम मंजुरी साठी  प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, वर्षा भालेराव , हेमलता कांडेकर व प्रभाग १० चे नगरसेविका इंदूबाई नागरे,माधुरी बोलकर,पल्लवी पाटील, नगरसेवक शशिकांत जाधव यांचे सहकार्य मिळाले म्हणून दोन्ही प्रभागातून जाणाऱ्या रस्तावर सदर दुभाजक होत असल्याची माहिती यावेळी दिनकर पाटील यांनी दिली.
      या  भूमिपूजनाचा कार्यक्रमाच्या प्रसंगी शहर अभियंता संजय घुगे,कार्यकारी अभियंता आर एस पाटील,विभागीय अधिकारी नितीन नेर,उपअभियंता संजय अग्रवाल,उपअभियंता रवी पाटील, नितिन राजपुत,विलास गायकवाड,जगदीश लोखंडे,तानाजी निगळ,भाजपा युवा मोर्चा चे अमोल पाटील, अनिल भालेराव व    मनपाचे ,सर्व विभागातील सर्व अधिकारी व  परिसरातील नागरीक उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!