नाशिक मिरर वेबटीम :आनंदवली मध्ये दारू पिण्यावरून वाद झाल्याने एकाने दुसऱ्याचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवार सायंकाळी ६.३० घडल्याची उघडकीस आले आहे. याबाबत अधिक माहितीनुसार आनंदवली येथिल शॉपिंग सेंटर मध्ये हा प्रकार घडला आहे. मृताचे नाव मोहन विष्णू लाहिरे (वय २९ रा.चुंचाळे,नाशिक )असे युवकांंचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसानी दिलेल्या माहिती नुसार आनंदवली येथे वास्तव्यास असणारा रुपेश यादव हा आनंदवल शॉपिंग सेंटरच्या मागच्या बाजूला मोहन बरोबर दारू पीत बसला होता. या दरम्यान दोघात वाद होत त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.संशयित रुपेश याने मोहन ला खाली पाडत मोहन यांच्या डोक्यात दगड खालून खून केल्याची घटना घडली आहे.संशयित छोटूलाल यादव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अंचल मुदगल तपास करत आहे.
