नाशिक मिरर वेबटीम  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व योगेश परुळेकर यांच्या संमतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन, सुविधा व आस्थापना विभाग कार्यक्षेत्र (नाशिक महानगर पालिका) नाशिक महानगर संघटक पदी सातपूर मधील विजय आहिरे यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी योगेश चिले यांच्या हस्ते विजय आहिरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. प्रदिपचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष  अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप  दातीर व शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन,सुविधा व आस्थापना विभागाचे सर्व पदाधिकारी तर्फे  विजय आहिरे यांचे  अभिनंदन करण्यात आले.

बातम्या

Don`t copy text!