नाशिक मिरर :
नाशिक जिल्ह्या व शहरात नव्याने सापडणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण १० टक्के च्या खाली आल्याने जिल्ह्या साठी सकारात्मक बाब आहे.म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक मधील लॉकडाऊन अंशतः शिथिल केले आहे. १ जून पासून काय बंद व काय सुरू असणार यांची नवीन नियमावली पुढील प्रमाणे..
■ नाशिक जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार.
■ औद्योगिक आस्थापना परिशिष्ठ अ मधील अटी शर्तीच्या अधीन राहून सुरू राहणार
■ कृषी उत्पन्न बाजार समित्या परिशिष्ठ ब मधील अटी शर्तीच्या अधीन राहून सुरू राहणार
■भाजीपाला विक्री ची वेळ स.७ ते २ राहणार.
■ मंगल कार्यालयात लग्न आणि अनुषंगिक कार्यक्रमांना बंदी 5 लोकांच्या उपस्थितीत विवाह नोंदणी कार्यालयात विवाह होतील.
■ दूध विक्री सवलत जैसे थे राहील
■रेशन दुकान स .७ ते १२ सुरू राहणार ■शिवभोजन केंद्र १० ते २ पर्यंत सुरू राहणार.
■अंत्यविधीसाठी 20 व त्यानंतरच्या विधीसाठी 15 व्यक्तींची मर्यादा
■बांधकाम क्षेत्राची ठिकाणे , शैक्षणिक वह्या पुस्तके , स्टेशनरी दुकाने , हार्डवेअर , गॅरेजेस , घर दुरुस्ती व इलेक्टरीकल साहित्य दुकाने सुरू राहतील
■हॉटेल, वाईन शॉप , मिठाई , बेकरी , दुकाने , धाबे केवळ पार्सल सुविधा स .७ ते सायं.७ पर्यंत सुरू राहणार.
■मॉल , नाट्यगृह , सभागृह सर्व बंद राहणार
■दु .३ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार
■शनिवार व रविवारी फक्त मेडिकल , वैद्यकीय आस्थापना , दूध विक्री व कृषी साहित्य विक्री सुरू राहतील
■मात्र हॉटेलची होम डिलिव्हरी सुरू राहील ■शासकीय कार्यालय 25 % क्षमतेने सुरू राहणार
■कषी साहित्य दुकाने ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू रहाणार.
