नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ९५ हजार ८११ रुग्ण कोरोनामुक्त

सद्यस्थितीत २ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक मिरर वेबटीम :
नाशिक जिल्हयात मार्च महिन्यापासून तर आज पर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा १ लाखाचा टप्पा पार केला असून, १ लाख ४२८ एकूण रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. या मधील जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ८११ कोरोना बाधीत बरे होऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. असून सद्यस्थितीत २ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १२०, चांदवड ८६, सिन्नर २९२, दिंडोरी ६९, निफाड २९६, देवळा ४०, नांदगांव ७८, येवला १६, त्र्यंबकेश्वर ३०, सुरगाणा ०२, पेठ ००, कळवण १९, बागलाण ८१, इगतपुरी २५, मालेगांव ग्रामीण ३४ असे एकूण १ हजार १९८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ४९७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ११३ तर जिल्ह्याबाहेरील २४ असे एकूण २ हजार ८३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात एक लाख ४२८ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९३.५७, टक्के, नाशिक शहरात ९६.३८ टक्के, मालेगाव मध्ये ९३.४२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.४० इतके आहे.

मृत्यु :नाशिक ग्रामीण ६६९, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९०२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १७१ व जिल्हा बाहेरील ४३ अशा एकूण १ हजार ७८५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :
◼️ एक लाख ४२८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९५ हजार ८११ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ८३२ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.४० टक्के.

नाशिक महानगरपालिका : नाशिक दि २८/११/२०२० वेळ:-६.४५ आजचे कोरोना बाधीत -१२३, आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६३८ , एकूण कोरोना रुग्ण:-६६,२५३, एकूण मृत्यू: – ९०२ (आजचे मृत्यू ००)

घरी सोडलेले रुग्ण :-६३,८५४ उपचार घेत असलेले रुग्ण:*- १४९७

(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

बातम्या

Don`t copy text!