१० तासात १ लाख ११ हजार रुपयांचा दंड वसूल
नाशिक मिरर वेबटीम :
सातपूर पोलीस स्टेशन हद्दी मधील सातपूर परिसरातील नागरिकांवर शासनाने व नाशिक मनपाने निर्देशित केलेल्या कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्या मुळे धडाकेबाज कारवाई करून नाशिक पोलीस ऍक्शन मोड वर आले आहेत.दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सातपूर मध्ये विविध ठिकाणी नाका बंदी करून १० तासात १६१ इसमावर कारवाई करत तब्बल १ लाख ११ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात थांबून आपल्या कुटुंबाची स्वतः ची काळजी घ्यावी.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इसमावर कारवाई करण्या बाबत सर्व पोलीस स्टेशन ला आदेश दिले आहेत.त्यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर मधील सकाळ सर्कल, रिलायन्स पेट्रोल पंप, अशोकनगर या ठिकाणी नाकाबंदी केली होती.तसेच सदर ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या १०० नागरिकांची महानगरपालिकेच्या मदतीने अँटीजन टेस्ट केली यामधून २ नागरिक कोरोनापॉझिटिव्ह सापडले.त्यांची कोविड सेंटर ला रवानगी करण्यात आली. विना मास्क फिरणे, सामासिक अंतर न पाळणे, संचारबंदी चे उल्लंघन करणे, सार्वजनिक जागेत थुंकणे, रस्ता वर हातगाडी, टपऱ्या उघड्या ठेवणे, ऑटो रिक्षा, खाजगी वाहन चालक अशा वर कारवाई करण्यात आली.
1) विना मास्क कारवाई 104 केसेस मध्ये दंड – 52,000/-
रुपये.
2) सार्वजनिक जागी थुंकणे कारवाई – 05 केसेस मध्ये
दंड – 5,000/- रुपये.
3) सोशल डिस्टन्सीग न पाळणारे आस्थापना वर
कारवाई – 02 केसेस मध्ये दंड – 10,000/रुपये.
4) वेळ न पाळल्याने आस्थापनेवर कारवाई 01
केस मध्ये दंड – 5 ,000/-रुपये.
5) संचार बंदी दरम्यान केलेली कारवाई – 21 केसेस मध्ये दंड
– 21,000/ रुपये.
6 ) रोड साईड हातगाडी व टपऱ्या कारवाई 09 केसेस
मध्ये 9000/- रुपये दंड.
7) सार्वजनिक वाहतूक ऑटो रिक्षा कारवाई 07 केसेस
मध्ये 3500/- रुपये दंड.
8) खाजगी वाहतूक करणारे वाहनचालकांवर 11 केसेस
मध्ये 5500 /- रुपये दंड
9) स्व. इंदिरा गांधी भाजी मार्केट 98 कुपन वाटण्यात
आले व 01 विना मास्क कारवाई करून 500/- रुपये
दंड केला आहे.
10 ) सकाळ सर्कल, अशोकनगर चौक आणि रिलायन्स
पेट्रोल पंप येथे नाकाबंदी ठिकाणी 100 इसमांची
तपासणी केली, त्यापैकी 02 positive मिळून
आले.त्यांना सीसीएस सेंटरला पाठविले आहे.
एकूण कारवाई – 161 केसेस मध्ये दंड = 1 लाख 11 हजार 500 /- रुपये जमा करण्यात आला.
