मरणयातना :  शव वाहिका न मिळाल्याने मुलीनेच कार मध्ये एकटी ने नेऊन केला अंतविधी

नाशिक मिरर :

कोरोना व्हायरस नाशिक मध्ये थैमान घातले असून, यामुळे मयत झालेल्या घटना माणसांचे मन हेलावून टाकत आहे. कोरोना रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्यास नाशिक मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन असक्षम ठरत आहे. अशीच एक घटना नाशिक।शहरात घडली आहे. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने पंचवटीतील एका कोरोनाग्रस्त आईला घरातच आपले प्राण सोडावे लागले असून, या मरण यातना कमी की काय, तब्बल चार तास प्रतीक्षा करूनही अंत्यसंस्कारासाठी शववाहिकाही न मिळाल्याने मुलीला आपल्या चारचाकी कार मधून मृतदेह स्मशानात नेऊन स्वतःला अग्नीडाग देवा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकारामुळे नाशिक महापालिका प्रशासन यंत्रणा किती हतबल व कुचकामी झाली असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील अमृतधाम परिसरातील उषा डिगंबर इंगळे (वय ७०) असे या मृत महिलेचे नाव आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह होत्या. त्यांना ऑक्सिजन ची गरज असल्याने ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी त्यांची मुलगी गायत्री यांनी चार- पाच दिवसांपासून बरेच प्रयत्न करत होती. अनेक सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांना फोन करून ऑक्सिजन बेड मिळवून देण्याची विनवणी करत होती. सर्वांनी हतबलता व्यक्त केली.अखेर रविवारी मध्यरात्री या आईने राहत्या घरातच अखेरचा श्वास घेतला. मात्र मृत्यूनंतरही त्या मुलीला आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी झगडावे लागले. चार तास प्रतीक्षा करूनही शववाहिका मिळाली नाही. अखेर या मुली नेच आपली कार काढली आणि कारमध्येच आईचा मृतदेह टाकून थेट स्मशानभूमीचा रस्ता धरला.

अंत्यसंस्कारासाठी मृत्यूदाखला लागत असल्याने जातानाच आधी मेरी कोविड सेंटर गाठले. तिथून मृत्यूदाखला घेतला आणि पुढे पंचवटी अमरधाममध्ये त्या मातेवर अंत्यसंस्कार पार पडले.

बातम्या

Don`t copy text!