नाशिक मिरर :  कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून बंद असणारी राज्यातील मंदिरे घटस्थापनेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुली होत आहेत. यामुळे दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनांसह जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा इशारा देण्यात आल्याने सुरक्षिततेच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली आहे.

नाशिकची ग्राम दैवत कालिका माता मंदिरांमध्ये नवरात्रौत्सवासह दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कालिका माता मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र उत्सव दि. 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार अटी-शर्तींच्या सक्तीनुसार दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

नवरात्रौत्सव काळात मंदिर दि. 7 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत दर्शनासाठी खुले राहणार आहे. भाविकांना ‘ई-दर्शन पास’द्वारे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी कालिका माता देवस्थानच्या वतीने ‘ई-दर्शन पास https://kalikamandirtrustetiken.xyz/kalikamata/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

भाविकांसाठी विविध सुचना

१) चप्पल, बॅग किंवा इतर कोणत्याही वस्तु स्वतःच्या वाहनांमध्ये ठेवाव्यात.
२) मंदिरामध्ये साडी, ओटी, नारळ, तेल, पुजेचे कोणतेही साहित्य किंवा इतर कोणतेही सामान घेवून जाण्यास सक्त मनाई आहे.
३) 10 वर्षाखालील तसेच 65 वर्षावरील व्यक्ती, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, रेड झोन, कन्टेन्मेंट झोन मधील व होम क्वारंटाईन असलेल्या भक्तांनी दर्शनाकरीता मंदिरात येवू नये.
४)मंदिरात देवीदर्शनासाठी येतांना आपले आधार कार्ड आणि दोन्ही लसीकरण झाल्याचा दाखला सोबत आणणे अनिवार्य आहे
५) दररोज मर्यादित संख्येमध्ये दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याने ’ई-दर्शन’ पास बंधनकारक राहिल.
६) सदरची सेवा निःशुल्क असून भाविकांसोबत ई पास किंवा त्याचा संदेश असणारा मोबाईल व प्रत्येकाचे आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवेश मिळणार नाही. एका पासवर नोंदणी केलेल्या सर्वांनी एकत्रच दर्शनासाठी जाणे आवश्यक आहे. एका पासवर एकदाच दर्शन करता येईल.
७) भाविकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. खराब मास्क, हातमोजे, फेस कव्हर मंदिर परिसरामध्ये इतरत्र न टाकता कचरा कुंडीतच टाकावेत.
८) दर्शन रांगेमध्ये 6 फुटाचे अंतर ठेवून वैयक्तिक अंतर नियमाचे पालन करावे.
९) दर्शन रांगेमध्ये व मंदिरामध्ये मोबाईल बंद ठेवावा.

बातम्या

Don`t copy text!