नाशिक मिरर :

नाशिक मधील सातपूर औद्योगिक वसाहतीमधील ललित हायड्रोलिक सिस्टीम या कारखान्यात दिनांक १८ सप्टेंबरला शक्तीशाली स्फोट होवून त्यामध्ये सुमारे ६ कामगार जखमी झाले होते त्यापैको तीन कामगारांचा मृत्यु झालेला आहे. सदरची बाब ही अतिशय दुर्दवी असून सदर कारखान्याचा निष्काळजीपणा मुळे सदर घटना झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी झालेल्या कामगारांच्या मृत्युची सखोल चौकशी होवून जबाबदार असणाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.याबाबत निवेदन सातपूर वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय च्या संचालक यांना दिले आहे.

धोकेदायक काम करताना काही निकष व नियम हे शासनामार्फत तयार करण्यात आलेले असून त्यानुसारच काम करणे आवश्यक असतांना केवळ वेळ वाचण्यासाठी कारखान्यामार्फत सुरक्षेच्या सोयींकडे सर्रासपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आलेले आहे व यामुळे निष्पाप कामगारांचा बळी गेलेला आहे. या कामगारांवर आपल्या संपूर्ण कुटुंबीयांच्या पालन पोषणाची जबाबदारी होती. या कामगारांच्या मृत्युमुळे त्यांचे कुटूंबिय रस्त्यावर आलेले आहे. त्यामुळे आजमितीस या कुटूंबांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तींवर कारवाई व कामगारांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई आदी बाबी तात्काळ करणे गरजेचे असल्याची मागणी निवेदन केली आहे. यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा,सातपूर विभाग अध्यक्ष योगेश लभडे,सचिन सांगळे, वैभव महिरे, विजय जगताप आदी उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!