सातपूर : नाशिक मिरर सातपूर उद्योग भवन जवळ गुरुवार दि. ५ रोजी महिंद्रा कंपनीच्या बोलेरो या चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. वाहनातून चार जण प्रवास करत होते.सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. अधिक माहितीनुसार गुरुवारी सव्वा बाराच्या दरम्यान कैलास केदार राहणार सिन्नर हे आपल्या भावासह बोलेरो क्रमांक एम एच ०५एम एक्स ५७०९ या गाडीने सातपूर उद्योग भवन आयटीआय परिसरतुन जात असताना अचानक गाडी मधून धूर आल्याने त्यांनी गाडी थांबवून बाहेर धाव घेतली . व गाडीने पेट घेतला. सातपूर अग्निशमन दलाने त्वरित धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
