बहिणीचा मृत्यू : भावावर उपचार सुरू

जळगाव : नाशिक मिरर वेबटीम ऐन भाऊबीजेच्या दिवशी भावासह बहिणीने केले विष प्राशन केल्याने बहिणीचा मृत्यू झाल्याची घटना तर भाऊ गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. अभ्यासातून आलेल्या नैराश्यातून भावाने विषारी द्रव प्राशन केले. तर या तरुणाच्या लहान बहिणीनेदेखील विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू ओढवल्याची घटना तालुक्यातील भोलाणे येथे घडली. ही घटना भाऊबीजेच्या दिवशी १६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत बहिण अश्विता विजय कोळी (19, रा. भोलाणे) हिचा उपचारार्थ रुग्णालयात हलवित असतांना मृत्यू झाला आहे. तर भाऊ विश्वजीत विजय कोळी (21) याच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत तालुका पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली. अभ्यासाच्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न सोमवारी 16 नोव्हेंबर रोजी पाडव्याचा आणि भाऊबीजेचा दिवस होता. याच दिवशी विश्वजितला अभ्यासाचं नैराश्य आलं. अभ्यासात मन लागत नाही म्हणून तो निराश झाला होता. तसेच आई वडीलांसोबत त्याचा याच कारणावरुन वाद झाला. वाद झाल्यानंतर त्याने घरातील शेतात फवारणीसाठी वापरल्या जाणार्या औषध प्राशन केले. त्याच दरम्यान दहा मिनिटांच्या अंतरानंतर त्याची लहान बहीण अश्विता हिने देखील घराच्या बाहेर जाऊन विषप्राशन केले. कुटुंबियांच्या प्रकार लक्षात आल्यावर दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करत असतांना, वाटेतच अश्विता हिचा मृत्यू झाला. तर विश्वजीत याला शहरातील अॅपेक्स या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अश्विता हिच्या मृत्यूप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अजय भोळे यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल साहेबराव पाटील करीत आहे.

बातम्या

Don`t copy text!