कामगाराना २० हजार ते ५६ हजार इतकी बोनस
सातपूर : नाशिक मिरर अंबड औद्योगिक वसाहतीमधील सिटू संलग्न नाशिक वर्कर्स युनियनचे विविध कंपनीतील कामगारांचे यशस्वी बोनस करार होऊन बोनस रक्कम कंपनीतील कामगारांना मिळाली आहे. त्यामुळे नाशिक, सातपूर, सिडको या औद्योगिक वसाहती मधील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कामगाराना २० हजार ते ५६ हजार इतकी बोनस रक्कम मिळाली असून कामगार मध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. करार यशस्वी होण्यासाठी कंपनीतील व्यवस्थापनाची भूमिका सकारात्मक राहिली. सदर करार करण्याकरिता युनियनच्यावतीने डॉक्टर डी.एल. कराड, सिताराम ठोंबरे व कंपनीतील कमिटी मेंबर यांनी सहभाग घेतला.
