म्हसरूळ पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बैठक
नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
येथील पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी विभाग – 1चे सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित व नवनिर्वाचित वरीष्ठ पोलीस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सांगण्यात आले की, मंडळांनी हा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गर्दी टाळावी. निर्जंतुकीकरण व थर्मल स्कीनिंगची व्यवस्था करावी. ज्येष्ठ नागरिक व मुले यांना विसर्जन स्थळी आणू नये.
यावेळी सुनील परदेशी, गणेश पेलमहाले, वैजयंती सिन्नरकर, क्षितीजा खटावकर, राजू थोरात, रवी गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.
नवनिर्वाचित वरीष्ठ पोलीस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी यांचा विविध संस्था व संघटनांनी सत्कार केला. यात माजी महापौर रंजना भानसी व नगरसेवक अरूण पवार आदींचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण काकड यांनी सूत्रसंचालन केले.
सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर व शिवाजी अहिरे, उपनिरीक्षक देविदास भालेराव, हवालदार नितीन तुपलोंढे, नाईक दीपक अरगडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक वराडे, महेंद्र हिरे आदी उपस्थित होते.
