नाशिक मिरर :

नाशिक शहर पोलीस हद्दीमधील गंगापुर पोलीस स्टेशन च्या वतीने कारवाई करून चोरीच्या एकूण ५ मोटार सायकल कळवण व साक्री येथून ताब्यात घेतल्या आहेत. गंगापूर पोलिसांनी सदर कारवाईची मोहीम पार पाडली.

गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल होतो.सदर गुन्ह्याचा तपास चालु असतांना पो. नाईक रविंद्र मोहिते यांना मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी शोध घेवून राकेश शिवाजी अहिरे (वय ३५ वर्षे, रा. यमुना हाईटस फ्लॅट नं. ८ यमुनानगर चांदशी नाशिक), प्रविण सदाशिव जगताप,( वय ४१ वर्ष. रा. मोरे मळा, चोपडा लॉन्सचे पाठीमागे गंगापुररोड) येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता आरोपी राकेश आहिरे व प्रविण जगताप यांनी गुन्हा केला असल्याचे कबूल केले. चोरी केलेल्या मोटार सायकल हया आरोपी राकेश आहिरे राहत असलेल्या चांदशी गाव येथुन एक मोटार सायकल, ता.कळवण जि. नाशिक येथून दोन मोटार सायकल तसेच ता.साक्री जि. धुळे येथुन दोन मोटार सायकल ताब्यात घेतल्या. यामध्ये गंगापुर पोलीस स्टेशन कडील तीन व इतर पोलीस स्टेशन कडील दोन असे एकुन पाच मोटार सायकल चोरी चे गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपीकडुन एकुण १ लाख ९० हजार रु. किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी गंगापूर पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, पो. हवालदार भरत बोळे, पो. नाईक रविंद्र मोहिते, गिरीश महाले,अनिल चारसकर,पोलीस शिपाई दिपक जगताप,समाधान शिंदे यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो. नाईक रविंद्र मोहिते हे करीत आहेत.

बातम्या

Don`t copy text!