नाशिक मिरर : मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे. शाळेत शिक्षक दिन आणि बैलपोळा सण साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे, संस्था सचिव ज्योती कोल्हे, मुख्याध्यापिका सुरेखा आवारे, यांच्या हस्ते शाळेत सरस्वती पूजन आणि भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच दादांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिन व बैलपोळ्याचे महत्व सांगून शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर स्कूल मधील इयत्ता आठवी, नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी गडगडसांगवी या गावे येथे जाऊन लहान मुलांना शिक्षणाचे धडे दिले. दहावीचा विदयार्थी शिक्षक चेतन सहाणे यांनी संख्या अक्षरांची ओळख करून दिली. तसेच पी. टी. चे धडे दिले. विदयार्थी व शिक्षकांनी मास्क चे वाटप करून मुलांनी कोरोनाविषयीची माहिती देऊन स्वतःचे रक्षण कसे करावे याबद्दल जनजागृति केली.
बैलपोळा साजरा करण्यासाठी मुलांनी आपल्या गोशाळेत जाऊन गाय व बैल यांना चारा व कणकेचे गोळे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवून गौमाताना खाऊ घालून हा आगळावेगळा उपक्रम साजरा केला. या उपक्रमासाठी ढोमसे मॅडम, वाडेकर सर, आढाव सर व मानवसेवक उपस्थित होते.
