नाशिक मिरर :

भारत देशाच्या स्वातंत्र्याला यंदा ७५ वर्षे पूर्ण झाल्याने जेसीआय नाशिक न्यु गोदावरी यांच्या वतीने तसेच माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे व क्षेत्रिय प्रचार कार्यालय, नाशिक यांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा शाहिरी देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सादरीकरण महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आनंद तरंग फाउंडेशनच्या कलावंतांनी केले. ह्यावेळी आपल्या शाहिरी बाण्याने सैनिकांची तसेच देशाच्या शौर्याची गाथा सुरेख पद्धतीने ह्या कलावंतांनी सादर केली.

कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल योद्धा मेजर दिपचंद नायक सर व त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक विजय कातोरे सर व त्यांचे कुटुंबीय, माजी सैनिक हरिष चौबे, अनिल नाठे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी चंद्रभानजी मालुंजकर, चंद्रकांत शिंदे त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसनजी खताळे, जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा सुनंदाताई जरांडे, नाशिक जिल्हा उपाध्यक्षा छायाताई पाटील हे उपस्थित होते.

यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिकांचा ह्यावेळी जेसीआय नाशिक न्यु गोदावरी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

करगिलच्या युद्धामध्ये आपले दोन्ही पाय व एक हाथ गमावलेल्या मेजर दिपचंद नायक, तसेच माजी सैनिक विजय कातोरे चंद्रभान मालुंजकर व चंद्रकांत शिंदे यांना गोदावरी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

उपक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेशजी दराडे, चारुदत्त आहेर, जीवन रायते, पुंडलिक बोडके, नितीन  निगळ, राहुल साळुंके त्याचप्रमाणे जेसीआय नाशिक न्यु गोदावरीचे माजी अध्यक्ष श्रीधर दिघोळे, चंद्रशेखर महाजन, बाळासाहेब पोरजे, योगेश मालुंजकर, किरण बोरसे, रघुनाथसिंह कुशवाह, निलेश तिवारी, अविनाश महाले, पराग कुलकर्णी, योगेश गवांदे, सुनिल मराठे आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.

उपक्रमाचे प्रकल्प संयोजक म्हणून जुनेद सलीम शेख यांनी उत्कृष्ट जबाबदारी सांभाळली व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष संदीप भोजणे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार करत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ह्यावेळी बोलतांना मेजर दिपचंद नायक यांनी कारगिलचा धगधगता इतिहास डोळ्यासमोर उभा केला व विजय कातोरे यांनी माजी सैनिक व शहिद सैनिकांची जीवनगाथा सर्वांसमोर मांडली.

उपस्थित सर्व प्रेक्षकांनी देशभक्तीपर मंत्रमुग्ध गाण्यांचा आनंद लुटत कार्यक्रमाचे कौतुक केले.

उपक्रम यशस्वीतेसाठी संदीप भोजणे, जुनेद शेख, रविंद्र पालवे, रविंद्र जगताप, सतीश वाघ, विजय धुमाळ, आकाश पोरजे, शुभ महाले, शुभम मोरे, अतुल कातकाडे, पलाश गुरसाळे, किरण सानप, ओम मालुंजकर, अक्षय लवंड, सनी लवंड, प्रतीक महाजन, आकाश पोरजे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकेश कटारिया व आभार प्रदर्शन सचिव सतीश वाघ यांनी केले.

बातम्या

Don`t copy text!