नाशिक मिरर : सातपूर मधील राधाकृष्णनगर,अशोकनगर भागातील गुंठेवारी शिवारात रविवार दि.२० मार्च रोजी रात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्या सुमारास चोरटे व समाजकंटकानी एक दुचाकी चोरी व एक दुचाकी जाळून टाकली आहे.यामुळे सातपूर मधील श्रमिकनगर व राधाकृष्णनगर व इतर भागात भीतीपूर्ण व दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की गुंठेवारी शिवारात रविवारी मध्यरात्री व पहाटे च्या सुमारास (एमएच १५ एवाय ७४६४ फॅशन प्रो )संदीप काशिनाथ देवरे यांची दुचाकी जाळून टाकण्यात आली असून, (एमएच १५ ईडब्ल्यू ७८२० शाईन) अनिल एकनाथ शिरसाठ यांची गाडी चोरट्यांनी चोरून नेली आहे. वरील एक दुचाकी चोरण्यात अयशस्वी झाल्याने चोरट्यानी सदर दुचाकी जाळून टाकली.यामुळे परिसरातील भीतीचे वातावरण आहे. १७ मार्च रोजी ४ घरफोड्या ची घटना होऊन ३ दिवस होत नाही तोच सदर घटना घडली असल्याने सातपूरकरणी गुन्हेगारी ला आळा घालण्याची मागणी सातपूर पोलिसांकडे केली आहे.१६ मार्च रोजी विश्वासनगर भागातून घरातून ५ ते ६ मोबाईल लंपास देखील करण्यात आले होते. गुन्हेगाराचा शोध घेण्यास सातपूर पोलिसांना आव्हान ठरत असून सातपूर पोलीस स्टेशनमध्ये नवीन वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती झाल्या पासून सातपूर भागत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी च्या घटना घटत आहे.

बातम्या

Don`t copy text!