महाविकास आघाडी वतीने संयुक्त बैठक
नाशिक मिरर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ व तीन काळे कायदे रद्द करण्याचा मागणी साठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने ‘ महाराष्ट्र बंद ‘ची हाक दिली आहे.
११ ऑक्टोबर सोमवार रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी बंद पाळावा, असे आवाहन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले. सातपूर येथे महाविकास आघाडीच्या वतीने संयुक्त बैठक आयोजित करण्यात अली होती.सातपूर करांनी बळिराजा पाठींबा देण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता एकदिवसीय कडकडीत बंद मध्ये सहभागी होण्याचे आव्हान यावेळी केले.सोमवार सकाळी १० वाजता सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व्यावसायिक व सातपूर करांना बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.शेतकरी काळा कायदा असुन या कायदयामुळे देशातील कृषी क्षेत्र मोठया संकटात येणार आहे. केंद्रातील कृषी कायदयामुळे शेतकरी हा परागंदा होणार असल्याने त्याचा परीणाम सर्वसाधारण व्यक्तीला देखिल भोगावे लागणार असल्याने नागरिकांनी देखील बंद सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे.
यावेळी शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, नगरसेवक भागवत आरोटे, मधुकर जाधव, संतोष गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, दिपक मौले,आबा मौले,गोकुळ निगळ, अरुण मौले, धीरज शेळके, अरुण घुगे, लोकेश गवळी, नितीन निगळ, जीवन रायते, रवींद्र देवरे, डॉ.अमोल वाजे, बाळासाहेब जाधव, किशोर निकम, विलास आहेर,प्रकाश खैरनार आदीसह शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, पक्षाचे पदाधिकारी शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
