लॉकडाऊन मध्ये शेतात आयुर्वेदिक पीक घेऊन मालावर फुड प्रोसेसिंग करुन स्वतः आयुर्वेदिक ब्रॅंड तयार करणाऱ्या युवा उद्योजकाची कहाणी
नाशिक मिरर विशेष : त्र्यंबक रोडवरील वासाळी गावातील प्रगतिशील शेतकरी शांताराम नामदेव चव्हाण यांनी अवकाळी पावसातून मोठ्या कष्टातून वाचविलेली १६०० गिलक्याच्या वेलांची बाग अज्ञात समाजकंटकांनी ऐन लॉकडाऊन मध्ये ब्लेडने कापून टाकली. त्यामुळे चव्हाण कुटुंबीय कमालीचे हवालदिल झाले होते. दरवर्षी अशाच प्रकारे शेतात पिकवलेला माल कधी अस्मानी संकटांनी तर कधी कवडीमोल मिळालेल्या भावा मुळे नुकसान होत होते.यावर पर्याय म्हणून शांताराम चव्हाण यांचा मुलगा युवा शेतकरी रोशन ने रडत बसण्यापेक्षा आयुर्वेदिक उत्पादणे तयार करण्याचा विचार केला. त्यासाठी आवश्यक आयुर्वेदिक झाडे व वेली ची लागवड आपल्या शेतात करायची असे ठरवले. आणि सुरुवातीला २५० रुपयांत सुरू करणाऱ्या या व्यवसायाचे आज वार्षिक १० लाखाची उलाढाल होत आहे. रोशन चव्हाण यांची यशस्वी उद्योजक होण्याची कहाणी जाणून घेऊ या.,
मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी नाशिक हुन नंदीग्राम ट्रेन मध्ये १२ तास जनरल डब्यात दाटीवाटीत प्रवास करून थेट कीनवट जि.नांदेड येथे पोहचले. पंचगव्य व आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवण्याचे प्रशिक्षण सुरू होते.येथ प्रशिक्षण पूर्ण करून नाशिकला घरी आल्यावर स्वत: स्वाभिमानी पंचगव्य ग्रामउद्योगांस सुरवात केली.
सुरवातीला २८० रुपयाचे कच्चा माल (आयुर्वेदिक वनस्पती)आणून प्रोडक्ट बनवण्यास सुरवात केली होती.
आज सोशल माध्यमातुन तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक प्रोडक्ट ची व्हॉट्सअप,फेसबुक यावर जाहिरात करून महिन्याला ७० ते ८० हजार रुपयांचे प्रोडक्ट विकले जात आहेत.

जीवन काढा (वनस्पती चहा), अश्वशक्ती प्रोडक्ट यांना भारतातुन मोठी मागणी आहे. शेतकरी कर्ज झाले की,आत्महत्या करतो.परंतु हताश होऊन आत्महत्या करणे हा पर्याय नव्हे ही एक पळवाट आहे.रोशन ने आलेल्या परीस्थितीसमोर गुढघे टेकुन रडन्यापेक्षा लढन्याचा मार्ग स्विकारला. आता पर्यत त्याचे प्रोडक्ट अमेरीका व लंडन पर्यत पोहचले आहे.तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्या मध्ये प्रोडक्ट स्पिडपोस्ट च्या माध्यमातुन डिलिव्हरी करण्यात येत आहे.
२८० रुपयात चालु केलेला उद्योग आज वार्षिक १० लाखाची उलाढाल करनारा ठरला आहे. येणाऱ्या काळात मोठा उद्योग उभा करण्याचा रोशन चा मानस आहे.
आज पंधरा हजार पेक्षा जास्त कुटुंबानी त्याचे आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरले आहे व वापरत आहेत.नविन उद्योग सुरू करण्यासाठी ना कुणाचे कर्ज घेण्याची वेळ आली. ना काही वस्तु विकण्याची वेळ आली. आयुर्वेदिक क्षेत्रात नावीन्य प्रयोग करून उद्योजक रोशन शांताराम चव्हाण व पत्नी सौ.स्वाती रोशन चव्हाण दांपत्याने मागणी नुसार भारतभर प्रोडक्ट पाठवण्यास सुरू केले आहे. तरुणांसाठी अभिमानास्पद प्रेरणादायी अशी गोष्ट आहे.
शेतकऱ्यांने सोनंं जरी पिकवल, तरी त्याला त्याची किंमत ठरवता येत नाही.पन त्याच शेतकऱ्यांने पिकवलेल्या मालावर फुड प्रोसेसिंग करुन स्वतः ब्रॅंड प्रोडक्ट बनवले, तर त्या वस्तुचे मुल्यवर्धन होते.त्याची किंमत पाच पट वाढते.आम्ही वेगळे काही केले नाही. औषधे बनवणाऱ्या हर्बल कंपन्या ज्या गोष्टी महाग विकत होत्या त्याच गोष्टी आम्ही आमच्या शेतात पिकवून शेतकऱ्यांकडून थेट विकत घेऊन निम्म्या किंमतीत बनवून शुद्ध बनवल्या.व ग्राहकांचे ५५ टक्के पैसे वाचवले.जे आज पर्यंत डीलर,डीस्ट्युब्युटर लोकांना जात होते.ते पैसे ग्राहकांच्या खिशातुन ,कष्टाचे जात होते. ते पैसे वाचवले. व थेट मार्केटींग करुन वर्षभरात १५ हजार पेक्षा जास्त ग्राहक तयार केले.म्हनुण मागणी जबरदस्त वाढली..! (ग्राहकांच्या पैशाची 55% बचत ,प्युअर.व जबरदस्त रीजल्ट हाच यशाचा मंत्र .)अश्वशक्ती व बाकी स्वदेशी उत्पादणे आजच बुक करा
स्वदेशी अपनाओं, देश बचाओ..!
– : श्री.रोशन चव्हाण
9657320084
संचालक : स्वाभिमानी पंचगव्य ग्रामउद्योग,वासाळीगाव ता.नाशिक.

