नाशिक मिरर :

सातपूर विभागातील प्रभाग क्र. ९ मधील गंगासागरनगर मध्ये रविवारी (दि. १०) झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्तावरील पाणी थेट घरामध्ये शिरले असल्याचे दिसून आले. रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी व्यवस्थाच नसल्याने सदर परिस्थिती मुसळधार पाऊस झाल्यास घरामध्ये नेहमी पाणी शिरते. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे अनेकदा तक्रारी करून देखील समस्या सुटत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. सदर समस्यांबाबत प्रभागातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सातपूर विभागाचे कार्याध्यक्ष कल्पेश कांडेकर यांना सदर बाब समजली असता त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली तेव्हा मोठ्या प्रमाणात रस्त्यांना तलावाचे स्वरूप आलेले दिसून आले. कल्पेश यांनी पाणी वाहून जाण्यासाठी असलेले पावसाळी गटार योजना वरील गटारीवर बसवलेली जाळीवरील घाण बाजूला सारली तेव्हा तेथील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. स्थानिक नागरिकांनी सदर समस्या कायम स्वरूपी सोडविण्याची मागणी केली आहे.

बातम्या

Don`t copy text!