नाशिक मिरर : प्रतिनिधी
येथील स्नेहनगरमध्ये श्री इच्छामणी गणपती मंदिरात परिसरातील महिला नवरात्रोत्सव साजरा करत आहेत. यात संजना पगार, लता सोनवणे, सरिता भोसले-निंबाळकर, मनिषा पाटील, सुचिता सावंत आदींनी मंगळवारी (दि.12) लाल साडी परिधान केली होती. सर्व महिला गोदाकाठी जाऊन देवीचे दर्शन घेऊन आल्या. तसेच या सप्ताहात सप्तशृंगी देवीचे वणी येथील गडावर जाऊन दर्शनही घेतले.
दरम्यान, शिवसेनेचे पदाधिकारी विशाल कदम यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. लता सोनवणे, सरिता भोसले-निंबाळकर, सविता निकम आदी उपस्थित होते.
—

