नाशिक मिरर : प्रतिनिधी

धम्मगिरी सामाजिक सांस्कृतिक संस्था व धम्मगिरी योग महाविद्यालय यांच्यावतीने योगशिक्षक पदविका (२०२०-२१) या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण समारंभ झाला. नवीन सिडकोतील मायको एम्प्लॉईज फोरमच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

यांची उपस्थिती

प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ योगतज्ज्ञ राज सिन्नरकर व अशोक पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ. हेमंत सोननीस, प्रा. डॉ. श्रीकांत सोनवणे, आयमाचे माजी अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, योगशिक्षक राजेंद्र काळे, डॉ. सतीश वाघमारे, विद्या वाघमारे, डॉ.पल्लवी जाधव, संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ योगतज्ज्ञ राज सिन्नरकर मार्गदर्शन करताना.

सर्व मान्यवरांनी योगशास्त्र आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्वाचा घटक आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, सर्व योगप्रेमींनी योगशास्त्राचा शास्त्रशुद्ध अभ्यास करावा, असे आवाहन धम्मगिरी सामाजिक सांस्कृतिक संस्था व धम्मगिरी योगा महाविद्यालयाचे संचालक डॉ . विशाल जाधव यांनी केले.

गुणवंत विद्यार्थी

पदविकेतील यशवंत असे :
प्रथम – आरती शिर्के, द्वितीय – ज्योती ढकरगे, तृतीय – अशोक सोनकांबळे. या विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यांचे प्रयत्न

प्रा. विलास लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी,ॲड. शरद जाधव, इंजि. किरण लोखंडे, पवन भदरगे यांनी प्रयत्न केले.

Don`t copy text!