घडलेला प्रकार लपवण्यासाठी बालिकेला मालेगाव मधील टेहरेगाव येथे ठेवले डांबून

नाशिक मिरर : सातपूर परिसरातील जाधव संकुल भागात सावत्र बापाने आपल्या ५ वर्षाच्या मुलीला किरकोळ कारणावरून मारहाण करत आणि अंगावर चटके देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.आरोपीचे नाव देविदास परशराम शेवाळे (वय २७ रा. सातपूर आशोकनगर) त्याचे मुळ गाव टेहरेगाव मालेगाव असून, आरोपीच्या विरोधात आय.पी.सी ३२४, ३२३, ५०४, ५०६, तसेच बालन्याय अधिनियम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या ५ वर्षीच्या मुलीला सावत्र पित्याने सातपूर येथील राहत्या घरी मारहाण केली व गोष्टीची परिसरात माहिती पसरताच सावत्र बापाने मुलीला त्याच्या मुळ गावाकडे नेऊन डांबून ठेवले असल्याचं समोर आले. मात्र परिसरातील स्थानिक नागरिकांनी गावाला जावून शोधले असता मुलीला आपल्या आजीचे घरी न ठेवताच वेगळ्या घरात पलंगाच्या खाली लपवून ठेवण्यात आले होते.संशयित आरोपीला सातपूर पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे, सहाय्यक पोलिस निरिक्षक ए.आय पाटील करीत आहेत. दरम्यान सावत्र बापाने आपल्या पाच वर्षे मुलीला केलेल्या अमानुष मारहाण आणि शरीर वर दिलेल्या चटक्यामुळे सातपूर परिसरातून या घटनेचा निषेध होत आहे.

Don`t copy text!