नाशिक मिरर: मागील सरकारच्या कार्यकाळात पासून सुरू झालेल्या मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते नाशिक पर्यंतच्या कामाचा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आढावा घेतला त्यावेळी नागपूर ते नाशिकपर्यंतचा महामार्ग मे २०२१ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल,’ असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

राष्ट्रीय महामार्ग आणि समृद्धी महामार्गाची आढावा बैठक घेण्यासाठी देसाई यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जि.प.सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय अधिकारी डॉ.स्वप्निल मोरे, सिल्लोडचे ब्रिजेश पाटील, उपअभियंता व्ही. एन. चामले, एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहुल, शहर अभियंता एस. डी. पानझडे, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाचे अजय गाडेकर उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!