नाशिक मिरर:  काल दुपारच्या दुपारच्या सुमारास सोन्याचे व्यापारी सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात आले असता त्यांनी दुचाकीवर ठेवलेली २० लाख रुपयांची बॅग चोरांनी लांबवली. सातपूरमधील अशोकनगर येथे त्याचं सोने-चांदीचे दुकानं आहे. त्यासंदर्भात सोने खरेदीसाठी सराफ बाजारात आले होते. यावेळी त्यांच्याकडे २० लाख रुपये असलेली बॅग होती. सराफ बाजारातील मारुती मंदिरासमोर त्यांनी दुचाकी उभी केली. त्यावेळी दुचाकीच्या हॅन्डलला लावलेली पैशांनी भरलेली बॅग चोरांनी पळवून नेली.

याप्रकरणाविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यानंतर पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी केली असता ठोस माहिती मिळाली नाही.

Don`t copy text!