लाखो रुपयांची ; लूट व्यवसायिक गंभीर जखमी

नाशिक मिरर :

सातपूर मधील श्रमिकनगर जवळील गंगासागर नगर मधील सराफी व्यवसायिकांची दि.५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जबरी मारहाण करून लाखो रुपयांची लूट केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,गंगासागर नगर मध्ये स्वामी हाईट्स बिल्डिंग मध्ये श्री यमाई माता ज्वेलर्स या नावाने महेश दिलीप टाग (सोनार) (रा.निर्मिती लाईफ प्लेस, वृदावन गार्डन जवळ, श्रमिक नगर) ज्वेलरी चे दुकान आहे. महेश हे नेहमी प्रमाणे शनिवारी रात्री ९ वाजून २० मिनिटं वाजेच्या सुमारास दुकानातील सोन्याच्या किंमती वस्तू व रोख रक्कम बॅग मध्ये भरून दुकान बंद करून आपली दुचाकी स्प्लेडरने राहत असलेल्या घरी जात होते.सदर दुकान व घराचे अंतर केवळ ९०० मीटर पर्यंतच असेल.याच दरम्यान श्रमिकनगर मधील नाल्या जवळ आसपास कोणी नसल्याचा फायदा घेत नजर ठेवून असलेले चार चोरटे पल्सर गाडी वर येऊन महेश यांच्या गाडीला मागून येऊन पुढे आडवे झाले. व फावडे, कोयता अशा धारदार शस्त्रांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

महेश यांनी विरोध केला असता डोक्यात व हातावर गंभीर दुखापत करून चोरट्यांनी बॅग हुसकावून पळून गेले. सदर संशयित चोरटे गेल्या आठ दिवसापासून सदर सोनाराच्या हालचाली वर नजर ठेवून सदर प्रकार केला असल्याचा संशय सातपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. महेश वर शिवाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तो गंभीर जखमी आहे. सोने व रोख रक्कम किती होती यांची माहिती अजून मिळालेली नसून लाखो रुपये लूट असेल अशी शक्यता आहे.

सदर घटनेमुळे सातपूर परिसरातील सोनार व्यवसायिक व नागरिकांमध्ये दहशतिचे वातावरण आहे.नाशिक शहरात अशा प्रकारे इतर काही घटना मागे घडल्या आहेत.त्यामुळे सातपूर पोलिसांसमोर सदर गुन्हेगाराचा शोध घेणे आव्हान ठरले असून आरोपी फरार आहे. सातपूर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे घटनेचा अधिक तपास करीत आहे.

बातम्या

Don`t copy text!