अशोकनगर रोड वरील रोजची वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी ;समस्या सोडवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

नाशिक मिरर वृत्तसेवा : 

शिवाजीनगर ते अशोकनगर या रस्त्याच्या कडेला उभे राहणारे अवजड वाहने, अशोकनगर येथील हातगाड्या वरील विक्रेत्यानी केलेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक, वाहतूक पोलिस उपस्थित नसने,सायंकाळच्या वेळेला अवजड वाहनाची रहदारी,वाढलेल्या शहराच्या माननाने, असलेला अरुंद रस्ता. या सर्व कारणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून, नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रोजची वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे.

शनिवार दिनांक. पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास, अशोकनगर रस्त्या वरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलीस कर्मचारी राजू गवळी यांस तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली.सदर युवकांना सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हवालदार राजू गवळी यांच्या फिर्यादी नुसार दुचाकी क्रमांक एम.एच १६ बी.आर  ५१३० यां गाडी चालवीणाऱ्या व्यक्तीसह अन्य दोघां वर गुन्हा दाखल केला आहे. वाहतुक कोंडीच्या समस्यावर उपाय योजना करून रोज होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

सातपूर हा भाग औद्योगिक परीसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांमध्ये कच्चा माल घेऊन येणारे व पक्का माल घेऊन जाणारे अवजड वाहने शिवाजीनगर ते अशोकनगर या रस्त्यावर उभी करण्यात येतात.यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे.या रस्तावर नेहमीच वाहनाची नेहमीच वर्दळ असते.हजारो कामगार,शालेय विद्यार्थी,महिला या रस्त्याने जात असतात.त्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.

 

अवजड वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने वाहनधारकांसह पायी चालणाऱ्या महिला कामगारांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते.याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याने अवजड वाहने चालक जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करतात.यामुळे छोटे-मोठे अपघात सुध्दा घडत आहे.या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या

Don`t copy text!