नाशिक मिरर वृत्तसेवा :
वासाळी येथील सेंट थॉमस स्कूलच्या वतीने परिसरात ठिकठिकाणी पथनाट्यद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. सेंट थॉमस स्कूलमधील विद्यार्थ्यांनी अशोकनगर, सातपूर कॉलनी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी जीवनावर आधारित पथ नाट्य सादर करत महाराजांना अभिवादन केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते राज्याभिषेक, अलौकिक अन् तेजस्वी जीवनगाथा विद्यार्थ्यांनी पथ नाट्यद्वारे सादर केले. मुख्याद्यापक नीलम चाकोर,अमृता निकम, सुनंदा काळे आदीसह शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

