सातपूर : नाशिक मिरर वेबटीम 
      तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. सकारात्मक संकल्पशक्ती मानवाला वैचारिक, आध्यात्मिक व भौतिक उंचीवर नेऊन ठेवते. संकल्प शक्तीचे प्रकार सकारात्मक विचार, नकारात्मक विचार, आवश्यक विचार, व्यर्थ विचार. आपले संकल्प चांगले असतील तर चांगले विचार मनात येतात.आणि तेच विचार आपणास यश शिखरावर पोहोचतात असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे  सुरेश साळुंखे यांनी मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्याल सातपूर येथे संकल्प शक्तीवर विचार पुष्प गुंफतांना वरील विचार मांडले.
                महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. उशीर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सुरेश साळुंखे यांनी आपले विचार मांडताना मानवाच्या अंतर्मनाची रचना सांगितली,. मानवाच्या मेंदूमध्ये एक ऊर्जास्रोत असतो. त्याला आपण आत्मा म्हणतो. त्याचे विश्लेषण विस्तृतपणे करताना मन विचार करते, बुद्धी निर्णय घेते, संस्कार परिणाम करतात .ज्योतिर्गमय म्हणजेच तेजाची पूजा केली पाहिजे.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक प्रा. संगीता गाडे यांनी केले. तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवाजी सुंभे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक शिवाजी गांगुर्डे ,प्रा. गणेश पाटील, प्रा. स्वप्नील साखला ,डॉ. सचिन राजोळे ,डॉ. सुरेखा गायकवाड, प्रा. एम. डी. शेंडगे,  तुकाराम जाधव,  रवी कराटे आदी प्रयत्नशील होते. ऑनलाइन व्याख्यानास विद्यार्थी व पालक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

बातम्या

Don`t copy text!