सातपूर  : नाशिक मिरर वेबटीम  सर्व ईपिएस १९९५ ,पिपीएफ १९७१ च्या पेन्शन धारकांनी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत हयातीचा दाखला डिजिटल करुन घेण्यासाठी कार्यालयात येवून गर्दी करण्याची आवश्यकता राहिलेली  नाही.यासाठी आपण आपले जीवन प्रमाणपत्र ज्या तारखेला केले असेल त्या तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असुन  ज्या पेन्शन धारकानी  जानेवारी २०२० नंतर  जीवन प्रमाणपत्र दाखल केले, असेल तर ज्यांना पेन्शन payment ऑर्डर 2020 मध्ये मिळाली असेल. त्यांना जीवन प्रमाण पत्र या वर्षी देण्याची गरज नाही. असे क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त एम अशरफ यांनी सांगितले आहे.
      याचप्रमाणे पेन्शन धारकाने आपल्या निवासस्थानाच्या नजीक असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रात जावुन जीवन प्रमाणपत्र नोंदणी करु शकतात,भारत सरकारने ३ लाखापेक्षा जास्त आधिकृत सेंटर यासाठी उभारली आहेत.पेन्शन धारकाचे खाते ज्या बँकेत असेल तेथेही जीवन प्रमाणपत्र नोंदवू शकता,याचप्रमाणे ज्यांना पेन्शन पेमेंट ऑर्डर २०२० देण्यात आले आहे. त्यांनी जीवन प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही.कोरोना महामारीच्या काळात गर्दी होवू नये .तसेच आपल्या सोयी प्रमाणे जीवन प्रमाणपत्र नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन देखील केले.

बातम्या

Don`t copy text!