वाहतुकीसह सुरक्षेचे तीनतेरा

नाशिक मिरर वेबटीम : दिवाळीचा सण मोठा…नाही आनंदाला तोटा असं म्हटलं जातं, मात्र कोरोनाची पार्श्वभूमी असून आरोग्याची कोणतीही काळजी न घेता शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा,रविवार पेठ,महात्मा गांधी रोड ,सीबीएस गर्दीने ओसंडून वाहत आहे.

शहरातील मेनरोड, शिवाजी रोड, शालिमार, रविवार कारंजा या मुख्य बाजारपेठेत नाशिककरांनी सणाच्या वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली आहे.या भागात कपडे, आकाशकंदील, पणत्या, शोभेच्या वस्तू, फराळाचे पदार्थ, लक्ष्मी पूजेचे साहित्य मिळत असल्याने शनिवार व रविवार असे दोन सुट्टीचा दिवस साधून खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने कोरोनालाच थेट आव्हान देण्याचं काम नागरिक करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नो मास्क, नो एन्ट्री असे फलक मनपाने व्यवसायिक यांना लावायला सांगितले असले, तरी बाजारपेठेत हे नियम तुरळक ठिकाणीच पाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुकानदार आणि ग्राहक असे दोघेजण कोरोनाचे रुग्ण वाढण्यास जबाबदार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दुकानदार मास्कचा वापर करतच नसल्याचं समोर आले आहे.रविवार कारंजा पासून शिवाजी रोड पर्यंत तर गावकरी सिंग्णल पासून दहीपुल पर्यंत, शिवाजी रोड पासून गाडगे महाराज चौक पर्यंत चारचाकी वाहनांना बंदी असून सुध्दा सर्रासपणे वाहन धारक वाहने घेऊन जात असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

बातम्या

Don`t copy text!