हेल्मेट न वापरणाऱ्या साठी नवीन उपक्रम ; मोहिमेसाठी शहर वाहतुक शाखेने युनिट निहाय प्लाईंक स्कॉट

नाशिक मिरर :

नाशिककर दुचाकीस्वारांनो सावधान हेल्मेट परिधान न करता दुचाकी चलावतांना पोलिसांना सापडले तर वाहन जप्त करून थेट पोलिसांच्या गाडीत बसून मुबंई नाक्यावरील नाशिक फर्स्ट येथे समुपदेशनासाठी दोन तास नेले जाणार आणि त्या नंतर जप्त वाहनासह सोडून दिले जाणार आहे.

नो हेल्मेट नो पेट्रोल पाठोपाठ नाशिक शहर पोलिसांचा ९ सप्टेंबर पासून नवा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नो हेल्मेट नो पेट्रोल मोहीम नाशिक शहरात सुरू केली आहे.परंतु पोलिसांच्या च लक्षात आले आहे की पेट्रोल भरण्यासाठी फक्त हेल्मेट वापरले जात आहे.पेट्रोल भरल्यानंतर हेल्मेट गाडी टांगून ठेवले जाते. गाडीला हेल्मेट आहे.परंतु डोक्यात हेल्मेट न घातल्या मुळे अपघातात अनेक दुचाकी चालकाचा प्राण गेल्या घटना शहरात घडल्या आहेत.

त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नवीन योजना रोबविण्याचे ठरवले आहे.त्यांनी आव्हान केले आहे मी, नाशिककरांनो कारवाई होईल म्हणून केवळ हेल्मेट नका वापरू आपल्या कुटुंबाकडे व अपघात मध्ये उध्वस्त झालेल्या कुटुंबाकडे पाहून तरी हेल्मेट वापरावे.

वाहन चालवतांना हेल्मेट न घालणा-या दुचाकी – वाहनधाराकाला आता दोन तास मुंबई नाका येथ समुपदेशन केंद्रावर तज्ञ व्यक्तीव्दारे समुपदेशन करण्यात येणार आहे.
समुपदेशनाचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच दुचाकी स्वाराचे वाहन ताब्यात देण्यात येणार आहे. ९ सप्टेंबर पासून ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शहर वाहतुक शाखेने युनिट निहाय प्लाईंक स्कॉट तयार केले आहे.

बातम्या

Don`t copy text!