राज्यभरातील मंदिरे भाविकांसाठी खुली व्हावी यासाठी सातपुरला मनसेने केलेल्या घंटानाद आंदोलकांना अटक व जामिनावर सुटका
नाशिक मिरर : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दक्षिण मुखी श्री साईनाथ महाराज मंदिर सातपूर कॉलनी येथे घंटानाद आणि आरती करून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला होता.काल या आंदोलकांना पोलिस ठाण्यात बोलावून अटक करण्यात आली व न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका केली.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, प्रभाग सभापती योगेश शेवरे, सातपूर विभागीय अध्यक्ष- योगेश लभडे, शहर उपाध्यक्ष विजय अहिरे सचिन सिन्हा. मिलिंद कांबळे, ज्ञानेश्वर बगडे.अंबादास आहिरे,कामिनी दोंदे.आरती खिराडकर, ताई ठोक व निर्मला ताई पवार, वैभव महिरे, निशांत(अण्णा )शेट्टी विशाल भावले, प्रवीण अहिरे, लक्ष्मण साळवेसह मनसे चे साईभक्त उपस्थित होते.

