सातपूर:नाशिक मिरर वेबटीम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त सातपूर राष्ट्रवादीच्या वतीने प्रभाग क्र १० मधील अशोक नगर येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उदघाटन मा.आ.अपुर्व हिरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष अंबादास खैरे,युवक उपाध्यक्ष नवराज रामराजे,नाशिक विधानसभा अध्यक्ष नितिन निगळ, सातपुर शहर अध्यक्ष जीवन रायते , सातपुर युवक विभागीय अध्यक्ष निलेश भंदुरे,सरचिटणीस विकास सोनवणे, बाळासाहेब जाधव, दत्ताजी वामन, धनंजय राहाणे, प्रभाग १० चे अध्यक्ष महेश जाधव आदीसह परिसरातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस सातपूर विभागाचे उपाध्यक्ष विश्वनाथ निकम, समाधान तिवडे, अरुण भोसले, किरण शिंदे, महेश जाधव, धनंजय खैरनार यांनी केले होते तसेच शिबिर आयोजित करण्यासाठी बिरला आय हाॅसपिटल व डाॅ.चौधरी यांचे सहकार्य लाभले.
