
कळवण : नाशिक मिरर तालुक्यातील नाळीद येथील देवराम तुळशीराम जगताप या शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा चाळीतून २५ ते ३० क्विंटल कांदा चोरीस गेला आहे. आजच्या बाजार भावानुसार अंदाजे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसामुळे लाल कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे लाल कांदा बाजारात येण्यास उशीर झाल्याने गावठी कांद्याचे भाव वाढले आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागात जाणवत असून तालुक्यातील नाळीद येथील आदिवासी शेतकरी देवराम तुळशीराम जगताप यांच्या शेतातील चाळीतून रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी २५ ते ३० क्विंटल कांदा चोरीस गेला आहे. आजच्या बाजार भावानुसार अंदाजे दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. आज दुपारी देवराम जगताप शेतातील चाळी जवळ गेले असता त्यांना कांदे कमी असल्याचे लक्षात आले. त्यांनी भ्रमणध्वनी वरून कळवण पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. बिट हवालदार सुरेश चौधरी यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
