नाशिक मिरर वृत्तसेवा : परतीच्या पावसाने जिल्ह्यात थैमान घातले असून अनेक ठिकाणी या जोरदार पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी ठाकरे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.मुंबईहून मालेगावकडे जाताना दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे. परतीच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं ही वस्तुस्थिती खरी आहे हे मान्य करत भुसे यांनी महाराष्ट्राच्या अनेक भागात मुख्यमंत्री दौरे करत असल्याचे सांगितले आहे.शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या शेत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे अशा सर्व ठिकाणी पंचनामे करण्याचे काम प्रगतिपथावर असून दिवाळीपूर्वी त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ठाकरे सरकार सक्षम आहे, ज्याच्या भागात शेत पिकांचं नुकसान झाला आहे.त्या ठिकाणचे पंचनामे करून किती क्षेत्राचं  नुकसान झालं आहे याची आकडेवारी कॅबिनेटच्या बैठकीत सादर करण्यात येणार असूननुकसंग्रस्त शेतकऱ्यांना  मदत करण्यासाठी धोरण घोषित करण्यात येणार आहे.

बातम्या

Don`t copy text!