नाशिक मिरर वेबटीम : दिंडोरी तालुक्यातील एकुण 121 ग्रामपंचायतींच्या 50 टक्के महिला सरपंच पदासाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, दिंडोरी येथे आरक्षण सोडत काढणेत येणार असलेची माहिती उपविभागीय अधिकारी, दिंडोरी  संदिप आहेर यांनी दिली. जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील दि. 30/01/2021 रोजीचे पत्रान्वये दिंडोरी तालुक्यातील महिला सरपंच पदासाठी आरक्षण निश्चितीबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. सदर निर्देशानुसार दिनांक 05/02/2021 रोजी सकाळी 10.00 वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, दिंडोरी येथे दिंडोरी तालुक्यातील एकुण 121 ग्रामपंचायतींच्या 50 टक्के  महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत बैठक आयोजीत केलेली आहे. दिंडोरी तालुक्यातील एकूण 121 ग्रामपंचायत पैकी 104 ग्रामपंचयात सरपंच पद अनुसुचित जमाती साठी राखीव असून यात 50 टक्के महिला सरपंच होतील व उर्वरित 17 ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जाती , जमाती, इतर मागासवर्ग व सर्वसाधारण यात 50 टक्के महिलांना सरपंच पदाची संधी मिळणार असल्याने नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे लक्ष महिला आरक्षण कडे लागले असून आपल्याला कशी संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या

Don`t copy text!