नाशिक मिरर :  नाशिक शहरात गेल्या आठ दिवसापासून  मान्सुन ऋतूचे आगमण झाले असून जोरदार पावसाची सुरवात झालेली आहे. नाशिक महानगर पालिकेने पावसाचे पाणी जाण्यासाठी पावसाळी गटार योजना राबविली आहे.
  ज्या ठिकाणी पावसाळी गटारी योजनेची लाईन टाकण्यांत आलेली आहे. त्या ठिकाणीचे चेंबर्स वरील झाकण, जाळी  साफ करण्याची मागणी शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख शाम फर्नांडिस यांनी सातपूर विभागीय अधिकारी नितीन नेर यांना निवेदन देऊन केली आहे.सातपूर मध्ये जाधव संकुल, अशोकनगर, सातपूर कॉलनी, सावरकर नगर, इतर भागात पावसाळी गटार योजनेमधील पाणी वाहून जाण्यासाठी असणारी चेंबर्स ची झाकणे व जाळ्या माती मुळे बंद झाल्या आहेत.
जाळी साफ नसल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरीकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. पावसाळा  पुर्वनियोजनाचे कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
Don`t copy text!