नाशिक मिरर वेबटीम : जिल्हा भराचे लक्ष लागून असलेल्या महिंद्रा अॅड महिंद्रा एप्लाईज युनियन च्या अध्यक्ष,जनरल सेक्रेटरी, सह आठ पदासाठी ७४ जणांनी आपले अर्ज दाखल केले आहे.यामध्ये आजी-माजी पदाधिकारी यांना नवखे उमेदवार टक्कर देण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. उद्या माघारीची वेळ आसून चित्र स्पष्ट उद्याच होणार आहे.
दरम्यान तबल सात वर्षां नंतर महिंद्रा एप्लाईज युनियन ची निवडणूक होत आसून या निवडणुकीकडे औद्योगिक क्षेत्रासह सर्वच राजकीय पक्षाचे व कामगार संघटनाचे लक्ष लागून आहे. आज पर्यंत एकूण आठ पदासाठी ७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले, आसून त्यात अध्यक्ष पदासाठी सद्याचे अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्यासह सात उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. चव्हाण यांना टक्कर देण्यासाठी माजी पदाधिकारी सह अनेक जन इच्छुक आहेत.तर महत्वाच्या जनरल सेक्रेटरी पदासाठी निवडणूक होण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पोपट देवरे सह ८ जनांनी अर्ज दाखल केले आहेत. देवरे यांच्या विरोधात आजी- माजी जनरल सेक्रेटरी ही मैदाणात उतरवल्याचे बोलले जात आहे. तसेच उपअध्यक्ष साठी ८, सेक्रेटरी साठी १५ ,जाॅईन सेक्रेटरी साठी १०, खजिनदार साठी ७, कमेटी मेंबर १ साठी १२ तर कमेटी मेंबर २ साठी ७ असे एकूण ८ पदासाठी एकूण ७४ अर्ज दाखल केले आहेत.
उद्या माघारीची मुदत आसून माघारी नंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल.

बातम्या

Don`t copy text!