भावले परिवाराच्या धाडसाचे सातपूरकरांनी केले कौतुक
नाशिक मिरर वेबटीम : त्र्यंबकरोड येथील वासाळी गावातील शेतकरी देवराम भावले यांच्या मळ्यात चंदनाची झाडे आहेत. आज दि.८ रोजी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास तिघा चंदन तस्कारांची टोळी चंदनाची महागडी लाकडे चोरी करण्यासाठी आली होती.परंतू भावले परिवाराला बाहेर काही तरी कुजबुज येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी चंदनाच्या झाडाजवळ कोणीतरी उभे असल्याचे पाहिले. देवराम भावले व परिवार घराबाहेर आल्याचे लक्षात येताच दोघांनी पळ काढला. तर एक जण झाडाजवळ सापडला.त्याला देवराम भावले,पांडुरंग भावले यांनी पकडले. या चंदनचोरांनी झाडाचे बरेच चंदनाचे खोड तोडले होते.
या चोरी बाबत सातपूर पोलिसांना कळविले असता पहाटे ४ सुमारास पोलिस पथक मळ्यात दाखल झाले.पोलिसांनी पकडलेल्या एका चंदनचोरास झाड तोडण्यासाठी लागणारे साहित्यासह ताब्यात घेवुन अटक केली असुन सातपूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल देखील जप्त करण्यात आले. एक संशयित चंदन तस्कर पकडल्या गेल्याने शहर भरातील अनेक चंदन तस्करीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसानी वर्तविली आहे.आधिक तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
