शेकडो रेशनकार्ड लाभार्थी हक्काच्या धान्यापासून वंचित
नाशिक मिरर वेबटीम : ऐन दिवाळी सणांच्या तोंडावर ग्राहकांनी रेशन घेण्यासाठी रेशन दुकान बाहेर गर्दी केली असून, स्वस्त धान्य वितरण योजनेतील बायोमेट्रिक प्रणाली सर्व्हर डाऊन व इंटरनेट सेवेला रेंज नसणे असल्या कारणामुळे ठप्प झाली आहे. शेकडो रेशनकार्डधारकांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.याबाबत स्वस्त धान्य दुकानदारास विचारले असता बायोमेट्रिक मशीन मधील सर्व्हर मध्ये या महिन्यात रेग्युलर वाटप मध्ये साखर वितरित करायची असल्याने तिचे अपडेशेन करण्यासाठी सर्व्हर बंद होते.असे स्वस्त धान्य दुकानदार शरद धामणे यांनी सांगितले.परंतु सर्व्हर डाऊन व नेटवर्क ची समस्या कायमची असल्याने लाभार्थी चे थम घेणे व धान्य वाटप करणे या प्रक्रियेला वेळ लागत असून यामळे रेशन दुकानाबाहेर लांबच लांब रांगा दिसून येत आहे.सर्व्हर डाऊन मुळे लाभार्थ्यांना ताटकळत उभे राहावे लागत असून अनेक प्रसंगी वाद झाल्याचे दिसून येत आहे. विशेष करून ग्रामीण भागात कोरोना महामारी व शेती नुकसान यामुळे भीषण परिस्थिती असताना गरीब आणि विशेषत:दुष्काळग्रस्त जनतेच्या पोटापाण्याचा मुख्य आधार असणार्या स्वस्त धान्य दुकानांमधून गेल्या काही दिवसांपासून रेशन देण्यास उशीर होत आहे. तर अद्याप काही रेशन दुकानात धान्य पुरवठा झालेला नाही . सर्व्हर डाऊनमुळे इ-पॉस मशीन्स बंद झाल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.
नाशिक शहरात २२९ स्वस्त धान्य दुकाने असून, शहरात सुमारे एक लाख १२ हजार ८२६, तर जिल्ह्यात ६ लाख शिधापत्रिकाधारक आहेत. रेशनबाबतचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी या दुकानांमधून आधार कार्ड व बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्यवाटप केले जाते. दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना रेशनवर फक्त गहू, तांदूळ मिळतात.गेल्या दोन दिवसांपासून रेशनवर गहू, तांदूळ, डाळ मिळालेली नाही. इ-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर ग्राहकांना रेशनवर धान्य मिळाल्याने गैरप्रकारांना थोडा आळा बसला आहे. सरकारच्या या निर्णयाचे रेशन दुकानदार व त्यांच्या संघटनांनीही स्वागत केले आहे; परंतु या मशीनमधील तांत्रिक दोष काढण्यात पूर्णत: यश न आल्याने सर्व्हर डाऊन झाल्यावर ही मशीन बंद पडण्याचे प्रकार अधूनमधून सर्रास घडत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यास त्याला दुरुस्त करण्यास कोणी वालीच नसल्यासारखी परिस्थिती आहे.

जिल्ह्यात ओएस कंपन्यांकडून इ-पॉस मशीन घेऊन ती दुकानदारांना दिली आहेत.यामध्ये कायम सर्व्हर डाऊन, इंटरनेट सेवा खंडित होणे, बायोमेट्रिक मशीन मध्ये थम मंच न होणे. यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार विना बायोमेट्रिक धान्य देता येत नाही.आज झालेला सर्व्हर डाऊन चा प्रॉब्लेम हा सिस्टीम मध्ये साखर वाटप चे ऑप्शन अँड करण्यासाठी झाला होतो. तो काही वेळाने ठीक झाला होतो. चालू महिन्याचे धान्य व साखर वाटप सुरू असून ते दिवाळी पूर्वी घेऊन जावे.- शरद धामणे,स्वस्त धान्य वितरक अशोकनगर
