सातपूरला रोजच ट्रॅफिक जाम पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष,
नाशिक मिरर वेबटीम :
कोरोना व्हायरस मुळे मार्च २०२० पासून अशोकनगर भाजीमंडई नाशिक महानगरपालिकेने बंद केल्याने भाजीबाजार अशोकनगर येथील मुख्य शंभर फुटी रस्त्यावर सुरू करण्यात आला आहे.यामुळे सातपूर मधील अशोकनगर, राज्य कर्मचारी वसाहत, वास्तू नगर,जाधव संकुल,सातपूरकॉलनी, राधाकृष्णनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, ध्रुवनगर आधी भागातून अशोकनगर येथे विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात.त्यामुळे अशोकनगर परिसर ग्राहकांचा हॉटस्पॉट ठरत आहे. सातपूर- अंबड औद्योगिक वसाहतीला मोठ्या कंपन्याना जोडणारा मुख्य रस्ता ट्रॅफिक जॅब होत आहे.त्यामुळे सदर रस्त्यावरील भाजीविक्रेते व इतर विक्रते याना पुनः भाजीमंडई मध्ये भाजी विक्री करण्याची सूचना करावी.ट्रॅफिक पोलिसांची कायम स्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. वाहतुकींच्या मुख्य रस्त्यावर विविध प्रकारची दुकाने थाटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ट्रॅफिक जाम होत आहे. यासाठी मनपा प्रशासन आणि पोलीस वाहतुक प्रशासन यांनी संयुक्तिक बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढून तसेच वाहनचालकांना नित्य होणाऱ्या त्रासापासून मुक्तता करून दिलासा द्यावा. अशी मागणी त्रस्त ज्येष्ठ नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
अशोकनगर येथे विशेषतः सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर ठाण मांडून बसणारे विविध प्रकारची दुकाने थाटून बसणारे बैठे भाजी विक्रेते, फळवाले, पाणी पुरी तसेच विविध सीझनचा धंदा करणारे हातगाडीवाले यांच्या मुळे वाहतूक ठप्प होत आहे. यासाठी जागरूक नागरिक तसेच नागरिक पोलीस प्रशासनास नेहमीच दूरध्वनी करून ट्रॅफिक जामची समस्या सोडवावी लागते. ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी बैठे विक्रेते दुकानदारांना या रस्त्यावर बसून अथवा हातगाडी लावण्यास मनाई करावी.अशी मागणी येथील त्रस्त नागरिकांनी केली आहे.
सण वार व इतर दिवशी या रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास रस्त्यावर धंदा करणारे विक्रेते व वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांमुळे रोजच ट्रॅफिक जाम होते. पोलीस नसल्याने वाहतूक ठप्प होते या संदर्भात वाहतूक शाखा, पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले पण या निवेदनाची दखल न घेतल्याने समस्या निर्माण होत आहे. सणावाराला वाहतूक ठप्प होऊन यावेळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा दूरवर पर्यंत लागून प्रचंड प्रदूषण होऊन तसेच वाहतुकीच्या खोळंब्यामुळे वाहनचालकांचे हजारो लिटर इंधन वाया जात असल्याने पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याच्या कडेला अवजड वाहने पार्क केल्याने वाहतूक ठप्पचे प्रकार मात्र नित्य घडतात. यासाठी प्रशासनाने कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करून वाहनचालकांना तसेच रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

अशोकनगरच्या शंभर फुटी रस्त्यावर दुभाजक केव्हा बसविणार –अशोकनगर परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्येचा ताण व वाहतुकीच्या समस्येवर उपाय म्हणजे दुभाजक बसविणे आवश्यक आहे.या रस्त्यावर महिंद्र कंपनीचे मटेरियल गेट आहे. यामुळे मोठमोठे ट्रेलर ट्रकचा रात्रंदिवस वावर असतो. तसेच श्रमिकनगर शिवाजीनगर सोमेश्वर गंगापूररोड येथे येणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या अनेक वाहनांच्या वाहतुकीमुळे दिवसभर नागरिकांना रास्ता ओलांडणे दुरापास्त झाले आहे. या रस्त्यावर नित्य अपघात घडत असूनही लोकप्रतिनिधी दुभाजकाची मागणी का करीत नाही या ठिकाणी दुभाजक बसविल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल.– नितीन निगळ, नाशिक पश्चिम अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
