राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक संस्था कडून अभिवादन नाशिक मिरर वेबटीम :
१.सातपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाजी मंडई मित्रमंडळ वतीने महामानवास अभिवादन
२.विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संकल्पित रिपाई तर्फे विनम्र अभिवादन
३.जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज
४.सातपूर भाजपा मंडल
५.प्रबुद्धनगर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
६.श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मध्ये महामानवास अभिवादन
सातपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाजी मंडई मित्रमंडळ वतीने महामानवास अभिवादन
सातपूर : येथील धम्म सागर प्रबोधन संघ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट व युवक मित्र मंडळ यांच्या वतीने घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले प्रारंभी विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली जेतवन बुद्ध विहार येथेही ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी धम्म सागर प्रबोधन संघाचे अध्यक्ष बाळासाहेब खरे, व बबलू शेजवळ, मनोज अहिरे, दामोदर जगताप, दिलीप काळे, सुभाष केदार ,एफ .एस जाधव भीमराव जगताप, सुरेश , राजेंद्र सोनवणे ,बाजीराव पगारे, के आर संसारे, चंद्रकांत पाटील, माधुरी काळे ,मधुकर भोळे आदी उपस्थित होते.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संकल्पित रिपाई तर्फे विनम्र अभिवादन
सातपूर: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपाई तर्फे शालिमार येथील पूर्णाकृती पुतळ्यास पक्ष नेते तथा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी संजय सानप, रेखा शेलार ,सागर साळवे, चंद्रभान पगारे ,किशोर गांगुर्डे, रवी तमखाने, किरण फुले, दिनेश उन्हवणे,अरुण काळे, बजरंग शिंदे, गोविंद सर आदी उपस्थित होते.
जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सातपूरमध्ये “भारतरत्न ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा
सातपूर : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सातपूरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.प्रतिमापूजन विद्यालयाचे प्राचार्य साहेबराव पाटील, अभिनव बाल विकास मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका निलम देशमुख, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका उषा कदम, संस्थेचे माजी शिक्षणाधिकारी व विदयालयाचे पर्यवेक्षक रमेश तासकर, प्रमोद कांगुणे ,एम.एम. कसबे या मान्यवरांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक गणपतराव पोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील संशोधनपर केलेले लेखन, कायदे, कामगारांचे हक्क ,अर्थशास्त्र आणि राज्य शास्त्र या विषयांवर आधुनिक भारताविषयीचे महत्त्व या बाबत थोडक्यात माहिती सांगितली.त्यानंतर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका एम.एम. कसबे मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली मराठी व इंग्रजी भाषेतील पुस्तके, ग्रंथ या विषयी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगतात माननीय साहेबराव पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह, काळा राम मंदिरात प्रवेश, शेतकऱ्यांच्या समस्या , स्वदेशी आणि विदेशी मालाबददल केलेले कार्य , भारतीय संविधानात असलेले नियम व कायदे याविषयीचा थोडक्यात आढावा या प्रसंगी घेतला. कार्यक्रमास विद्यालयातील सांस्कृतिक मंडळातील सदस्य , कला ,क्रीडा, अभिनव बाल विकास मंदिर विभाग आणि माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री बस्ते, सविता ठाकरे यांनी केले व आभार रायभान दवंगे यांनी मानले.
सातपूर भाजपा मंडल
सातपूर : विश्वभुषण महामानव ङाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी सातपुर मंडल च्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सातपुर प्रभाग सभापती रविंद्र धिवरे, रामहरी संभेराव उपाध्यक्ष नाशिक, सातपुर मंडल अध्यक्ष अमोल ईघे, सरचिटनीस भगवान काकड, चारुदत्त आहेर. राजेंद्र चिखले महीला अध्यक्षा संगीता शेळखे, उदय बोरसे, नितीन शेवरे, स्वप्निल धिवरे, विकी पाटील व परीसरातील नागरीक उपस्थित होते.
प्रबुद्धनगर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सातपूर : येथील प्रबुद्धनगर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरवात भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास माजी नगरसेविका ज्योति शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कर्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना त्रिशरण पंचशीला ने करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन पर प्रबोधनात्मक पर गीत कु. प्रथमेश चंद्रकांत पालवे व कु.दिपक दोंदे यांनी गीत सादर केले.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर संघर्ष करून राष्ट्रचा पाया समता ,स्वंतत्र बंधुभाव,न्याय या तत्वावर सविधान देऊन उभा केला. युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करावे असे प्रस्ताविक भाषणात बजरंग शिंदे यांनी मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले या प्रसंगी बुद्ध वंदना,भीम स्तुती देविदास अहिरे यांनी घेतली या प्रसंगी रमेश जाधव,गणेश झनकर,ज्ञानेश्वर बटावे, देवराम पगारे,रमेश मोरे,रंगा पवार,संतोष पगारे,भाऊसाहेब पवार,रब्बानी शेख,अशोक वावळ ,विक्रम शिंदे,समाधान जाधव,भीमा गांगुर्डे ,बेबी मोरे,कुसम मोरे,सावित्री गांगुर्डे, लक्ष्मी पंचागे,कस्तूरबा वानखेड़े आदी उपस्थित होत्या.
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मध्ये महामानवास अभिवादन
सातपूर : सातपूर येथील विविध विकास संघटना संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला उपशिक्षिका संध्या ठाकरे व पर्यवेक्षिका उज्वला जगदाळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माध्यमिक विभाग मुख्याध्यापक सखाराम पवार यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास संस्थेचे शिक्षणाधिकारी पी बी रायते, कल्पना शिंदे, विपुल जोशी, संतोष गिरी, विश्वास बीबबे, लतिका बोंबटकर, संतोष गिरी, बाबाजी पवार, पंकज काळे, ग्रंथपाल विजय धुमाळ, सोनाली ठाकरे आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
