पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची महत्त्वपूर्ण घोषणा

नाशिक मिरर वेबटीम :
केवळ कोरोना काळातच नव्हे तर आता यापुढे नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणताही सार्वजनिक कार्यक्रम पोलीस परवानगीशिवाय आयोजित करता येणार नाही, अशी घोषणा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केली आहे.पंचवटीतील आडगाव पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.५) आयोजित शांतता समितीच्या बैठकीत एका नागरिकाने केलेल्या तक्रारीला उत्तर देताना आयुक्त पांडे यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये गर्दी होणारे लग्न सोहळा, सामाजिक, धार्मिक आदी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र हा नियम कोरोनानंतरही कायम राहणार असून, महिनाभरातच यासंदर्भात नियमावली जाहीर केली जाणार असल्याचेही पोलीस आयुक्त पांडे यांनी सांगितले. त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला होणाऱ्या गर्दीवर कायमस्वरूपी नियंत्रण राहणार आहे. विशेष म्हणजे नागरिकांसोबतच मंगल कार्यालये, लाँन्स चालकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

बातम्या

Don`t copy text!