१२ में ते २२ में असणार लॉकडाऊन
जिल्हा प्रशासनाचा निर्णय : अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व आस्थापना बंद ; औद्योगिक वसाहती राहणार बंद
नाशिक मिरर :
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवार (दि.१२) ते शनिवार (दि.२२) असा १० दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. लाॅकडाऊनमध्ये वैद्यकीय आस्थापना वगळता अन्य सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचा विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात ब्रेक द चेनअतंर्गत निर्बंध लागू असताना देखील बाजारपेठांमधील गर्दी कायम आहे. तसेच
रूग्णसंख्येतही अपेक्षित घट होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे या आजाराला पायबंध घालण्यासाठी सांगली, बारामती, अकोल्याच्या धर्तीवर आता कठोर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यानूसार बुधवारपासून हा लाॅकडाऊन असणार आहे.
लाॅकडाऊन काळात वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहतील. किराणा मालाच्या होम डिलिव्हरीला मुभा देण्यात आली. तर बाजार समित्या तसेच इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोल पंपावर अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींनाच
इंधन ऊपलब्ध करून दिले जाईल. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानादेखील आजही नाशिककर नियमांचे पालन करताना दिसून येत नाही.
बाजारपेठांमध्ये विनाकारण गर्दी होत आहे. ग्रामीण भागात बाजार समित्यांमध्ये ही तोबा गर्दी होत असल्याने कोरोनाचा वेगाने वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३ हजार १७४ अॅक्टिव्ह रूग्ण असून मृतांचा संख्याही अटोक्यात येत नसल्याने सरतेशेवटी प्रशासनाला कठोर लाॅकडाऊनचा निर्णंय घ्यावा लागला आहे.
