नाशिक मिरर : राज्यात महापुराने मर्यादा ओलांडल्यामुळे अनेक परिवार उध्वस्त झाले असल्याने बाधित पूरग्रस्तांसाठी एक मदतीचा हात हा सामाजिक उपक्रम आणि सामजिक बांधिलकी जोपसण्यासाठी सातपूरचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष नितीन निगळ यांच्या वतीने विधानसभा शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्याकडे पूरग्रस्तासाठी बेडशीट,कपडे आणि थंडी पासुन बचाव करण्यासाठी ब्लँकेट पांघरुन सुपूर्द केले.
मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी कार्यकर्ताचे मनपुर्वक आभार मानले. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष नितीन बाळा निगळ, जय कोतवाल,निलेश भंदुरे,विशाल डोके,अक्षय पाटील, कल्पेश कांडेकर, रामदास मेदगे,जानू नवले,भावेश निर्वाण आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
