नाशिक मिरर :  येथील प्रभाग क्र.१० मधील अशोकनगर,राधाकृष्णनगर, राज्य कर्मचारी वसाहत ,वास्तू नगर  परिसरात डेंग्यू ,मलेरिया, चिकनगुनिया या साथीच्या रोगाचे प्रमाण अधिक वाढले असून त्यावर नियंञण आणण्यासाठी शिवसेना सातपुर विभाग व रायगड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रास कटींग मशीन,जंतूनाशक औषध फवारणी पंप व जनजागृती रथ फिरवणे ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेच्या उद्घाटन शिवसेना उपमहानगरप्रमुख देवा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. याकार्यक्रमाचे आयोजन रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी केले होते.  याप्रसंगी गोकुळ नागरे,शांताराम कुटे,युवराज धाञक, किशोर निकम, अविनाश सोनवणे, योगेश बेदाणे, गणेश आहेर,प्रसाद खैरनार,डि.एल म्हस्के,के एल म्हस्के,बाळासाहेब शिंदे, संजय गायकवाड,बाळासाहेब गाडे,पोपट आहेर, नारायण पवार,साहेबराव काळे, विष्णुपंत कोठे, देवाजी वाघ, व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातम्या

Don`t copy text!