नाशिक मिरर :
सातपूर मधील अशोकनगर रोडवर स्टेट बँक ऑफ इंडिया जवळील फँक्चर जवळ मंगळवारी रात्री एक कार चालकाला दुभाजकाचा अंदाज न आल्याने कार सोबत चक्क दुभाजकावर चढला होतो.त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहन चालक माझा विमा असल्याने मला भरपाई मिळणार असल्याने कार तशीच दुभाजकावर चढलेल्या अवस्थेत तशीच राहू द्या, मला भरपाई मिळेल असे कार चालकाने पोलिसांना सांगितले पण वाहतुकीला त्रास होईल असे पोलीसांकडुन सांगण्यात आले.त्या ठिकाणी पोलिस व कार चालकाचा चांगलाच वाद झाला होता.शेवटी कार आहे त्या अवस्थेतच पोलिस ठाण्याकडे रवाना झाली.यासर्व वादावादीत बाचाबाची देखील झाली.यामुळे बघ्यांनी एकच गर्दी केली होती.
दरम्यान ठेकेदार व लोकप्रतिनिधीच्या नियोजन शून्य कामामुळे वाहतूक समस्येत मध्ये वाढ झाली आहे.याकडे वहातूक शाखा व सातपूर पोलीसांकडुन दुर्लक्ष होत असल्याने तसेच रस्त्याच्या कडेला व्यवसाय करनाऱ्या हातगाड्या, नित्य पार्क केलेले अवजड ट्रक,ट्रॉली देखील वहातूक ठप्प होण्यास कारणीभूत ठरत आहे. यासाठी सायंकाळच्या वेळेत वाहतूक पोलिसाची नेमणूक केली जावी अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
सातपूर विभागातील त्र्यंबक-गंगापूर लिंकरोड वरील अशोकनगरच्या १०० फुटी रस्त्यावर नित्य होत असलेल्या लहान मोठ्या अपघातांमुळे गेल्या अनेक वर्षा पासून सदर रस्त्याचे रुंदीकरण करून दुभाजक टाकण्याची मागणी त्रस्त नागरिक व वाहनचालकांनी केली होती.त्यानुसार सदर काम मंजूर होऊन प्रभाग क्रमांक ९ व १० मधून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व दुभाजक टाकण्याचे काम दोन महिन्यापासून संथ गतीने सुरू आहे.
परंतु सदर रस्त्याचे रुंदीकरण व दुभाजक टाकण्याचे कामात नाशिक मनपाचे बांधकाम विभाग , ठेकेदार यांच्या नियोजन शून्य कामामुळे सदर कामाचा त्रास वाहनचालक,पादचारी, व्यावसायिक व रहिवासी यांना मोठ्या प्रमाणात होत आहे.
सदर रस्ता हा त्र्यंबक व गंगापूर रोड ला जोडणारा व सातपूर- अंबड औद्योगिक वसाहती जोडणारा मुख्य रस्त्या आहे. सदर रस्त्यावर सर्वात मोठी कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा चे मटेरियल गेट आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे कंटेंनर व ट्रक,ट्रॉली आयशर अशी अवजड वाहने याच रस्त्यांवर चोवीस तास उभ्या असतात .अशोकनगर श्रमिकनगर येथे सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीमुळे कामगारांची सतत वर्दळ असते.त्यामुळे सदर नियोजन शून्य कामामुळे अपघात च्या प्रमाण वाढण्यासोबतच सायंकाळी ट्रॅफिक जाम होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुभाजक देखील विविध व्यावसायिक यांच्या मागणी नुसार टाकले जात आहेत. तर कुठे ५०० मीटर पर्यत दुभाजक काम करणेचे टाळले जात आहे. सदर कामाकडे व लोकप्रतिनिधीचे देखील दृर्लक्ष झाले आहे.खोदून ठेवलेल्या रस्त्यावर वाहन चालक पडण्याचे व रहदारीच्या वर्दळी तुन मार्गक्रमण करतांना वाहनाची ठक्कर होत असल्याने वाहनचालकामध्ये नित्य वादविवाद होत आहे. दरम्यान दि.८ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजता एका वाहन चालकाला खड्डाचा अंदाज न आल्याने खड्यात पडून जखमी झाला. जवळच तैनात असलेल्या अशोकनगर पोलीस चौकी मधील पोलीस कर्मचारी यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. दुभाजक बसवून झाल्यानंतर देखील रस्त्या रुंदीकरण व विजेच्या खांब या मुळे सदर रस्त्यावर अडथळे कायमच राहतील असे एकंदर या कामातून दिसून येत आहे.त्यामुळे वाहनचालक व नागरिकांनी रस्त्या रुंदीकरण करून त्वरित दुभाजकाचे पूर्ण करण्याची मागणी मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे निवेदन देवून केली आहे.
दरम्यान ठेकेदार व लोकप्रतिनिधीच्या नियोजन शून्य कामामुळे वाहतूक समस्येत मध्ये वाढ झाली आहे.याकडे वहातूक शाखा व सातपूर पोलीसांकडुन दुर्लक्ष होत असल्याने तसेच रस्त्याच्या कडेला व्यवसाय करनार्या हातगाड्या, नित्य पार्क केलेले अवजड ट्रक,ट्रॉली देखील वहातूक ठप्प होण्यास कारणीभूत ठरत आहे. यासाठी सायंकाळच्या वेळेत वाहतूक पोलिसाची नेमणूक केली जावी अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.
