महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या मंत्रालय, मुंबई ते मुख्यालय राजीव गांधी भवन नाशिकपर्यतच्या पाठपुराव्याला अखेर यश
नाशिक मिरर : नाशिक महानगरपालिका शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांना १ जून २०२१ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी व भत्ते लागू करण्यास मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी १७ जून २०२१ रोजी मान्यता दिली आहे. त्या आदेशानुसार मनपा शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांनी १९ जुलै २०२१ रोजी मनपा शिक्षण विभागातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांची सातव्या वेतन आयोग मंजूर वेतनस्तरांनुसार वेतन निश्चिती करणेबाबत ७३८ शिक्षकांना आदेश देण्यात आला.
व ७३८ प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतनस्तरानुसार वेतननिश्चिती करून जून पेड जुलैच्या पगारात सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात आले आहे. त्याबद्दल मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनकर यांची भेट घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे अध्यक्ष सुरेश खांडबहाले ,सरचिटणीस शिवाजी शिंदे यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले.तसेच कार्यालयीन अधीक्षक चंद्रकांत थोरात, आस्थापना प्रमुख बाबासाहेब वाघ,सुदाम धोंगडे,विलास इंगळे,राजाराम पवार , हरीश तायडे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. तसेच सातव्या वेतन आयोग लागू करण्यासाठी मदत करणारे शिक्षक विशाल चव्हाण, सुनील गावित, शिरीष पाडवी,जगन्नाथ भोये, विशाल क्षीरसागर, गोकुळ बिरार यांचेही संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.मनपा प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेच्या वतीने मंत्रालय,मुंबई ते मुख्यालय राजीव गांधी भवन नाशिक पर्यंत सातत्याने गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा चालू होता त्याला अखेर यश मिळाले त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

